बांगलादेशाच्या शपथविधीला १३ देशांसह भारताला आमंत्रण...
नवी दिल्ली - बांगलादेशाच्या २०२६ निवडणुकीत नॅशनलिस्ट पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी त्यांनी १३ देशांसह भारताला आमंत्रित केले आहे.
यामध्ये भारत, चीन, सौदी अरेबिया, तुर्की, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांचा समावेश आहे. २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या प्रचंड विजयानंतर हा समारंभ राष्ट्रीय संसदेच्या दक्षिण प्लाझा येथे आयोजित केला आहे.