गोवेकर, कसबेकर, पट्टेकरींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान...

<p>गोवेकर, कसबेकर, पट्टेकरींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान...</p>

कोल्हापूर - मुंबईतील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी संस्थेच्यावतीने काव्य लेखनासाठी पुरस्कार दिला जातो. यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील चार जणांना पुरस्कार जाहीर झाला होता. आळंदी येथे   पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये आजरा तालुक्यातील गणेशवाडी विद्यामंदिरच्या शिक्षिका अनुष्का गोवेकर यांना सलग पाच वर्षे काव्य लेखन स्पर्धेतील सहभागाबद्दल साहित्य जीवन गौरव, निलेश कसबेकर यांना कलारत्न, अश्विनी कसबेकर यांना साहित्यरत्न तर सुषमा पट्टेकरी यांना काव्यभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसुदन घाणेकर आणि कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खैरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या प्रसंगी अनुसया खैरे, हरिभक्त परायण रोहीदास दस आदि उपस्थित होते.