Breaking news |

कोल्हापूर - श्री गजानन महाराज यांनी झामसिंग राजपूत यांना दिलेल्या मुळ चरण पादुका या पंढरपूर व शेगाव पायीदिंडी सोहळ्यात दर्शनास असतात. महाराजांच्या या मुळ चरण पादुका १७ आणि १८ मे २०२५ कोल्हापूर नगरीत भक्तांच्या दर्शनासाठी येत आहेत. तरी सर्व भक्तांनी वेळेत येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक राकेश दिनकर कापशीकर यांनी केले आहे. श्री गजानन महाराज शेगाव यांनी १९०६ ला आपल्या मुळ चरण पादुका मुंडगांवच्या झामसिंग राजपूत यांना दिल्या होत्या. राजपूत यांनी त्या पादुकांची आपल्या वाड्यात स्थापना करून पादुका मंदिर उभारले. तसेच १९०८ ला पुंडलिक भोकरे, मुंडगांव यांच्या स्वप्नात दृष्टात दिल्याप्रमाणे श्री गजानन महाराजांनी शेगाव येथुन झामसिंगाकडे प्रत्यक्षात स्वतःच्या चरण पादुका पुंडलिक भोकरे यांना देण्यासाठी पाठवल्या. भोकरे यांचे राहते घर लहान व पर्याप्त नसल्याने या दिव्य पादुकांची सुरक्षा रहावी व सर्व भक्तांना दर्शन करता यावे म्हणून झामसिंग यांनी स्वतःचा वाडा व ३१ एकर शेती श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव या संस्थेला दान केली. श्री गजानन महाराज यांनी दिलेल्या मुळ चरण पादुका या पंढरपूर व शेगाव पायीदिंडी सोहळ्यात दर्शनास असतात. महाराजांच्या या मुळ चरण पादुका अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर नगरीत भक्तांच्या दर्शनासाठी येत आहेत. शनिवारी १७ मे रोजी सकाळी ९.३० ते रात्री ८.३० आणि रविवारी १८ मे रोजी सकाळी ७ ते रात्री ७ वा. पर्यंत कोल्हापुरातील श्री केदारनाथ सांस्कृतिक भवन, क्रशर चौक, (तलवार चौक) इराणी खणीनजिक, सिग्नल जवळ, सानेगुरूजी रोड येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी सर्व भक्तांनी वेळेत येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक राकेश दिनकर कापशीकर यांनी केले आहे.
अवश्य वाचा
![]() |
इचलकरंजी शहरातील अनेक चौकाचौकात पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवून केला निषेध | |
06 May 2025, 12:51:07 PM |
![]() |
कोल्हापूर रेल्वे स्थानकात महिलेवर अतिप्रसंग ? | |
05 May 2025, 07:58:57 PM |
![]() |
तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत 'या 'संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश | |
05 May 2025, 07:26:25 PM |
![]() |
डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल ९९.१७ टक्के | |
05 May 2025, 05:29:24 PM |
![]() |
‘इंडियन आयडॉल’ चा विजेता अपघातात जखमी | |
05 May 2025, 05:21:38 PM |
![]() |
स्केटिंगपटू अधिराज अथणे याचा स्केटिंग करत १०३ मिनिटे लाठी फिरविण्याचा उद्या विक्रम | |
05 May 2025, 04:26:14 PM |
![]() |
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कन्येचे 12 वीत घवघवीत यश | |
05 May 2025, 02:28:00 PM |
![]() | जिल्ह्यातील 4 लाख 80 हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप... | |
---|---|---|
05 October 2023, 12:55:49 PM |
![]() | रेल्वेमध्ये ‘रील्स किंवा व्हिडीओ’ करताय मग तुरुंगाची हवा खायला तयार रहा... | |
---|---|---|
05 October 2023, 12:35:28 PM |
![]() | नीरज चोप्रानं जिंकलं सलग दुसरं आशियाई सुवर्ण | |
---|---|---|
05 October 2023, 12:31:27 PM |
![]() | आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांसाठी आभासी वास्तविकता प्रणालीची निर्मिती | |
---|---|---|
05 October 2023, 11:41:26 AM |
अन्य बातम्या
22 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका... | ||
23 February 2025, 12:17:23 PM |
घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहापूर पोलिसांनी केली अटक | ||
06 December 2024, 05:34:03 PM |
उर्वरित 10 टक्के आनंदाचा शिधा देण्याची रेशन दुकानदार संघटनेची मागणी | ||
01 September 2024, 03:47:00 PM |
रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..! | ||
11 April 2024, 06:20:21 PM |
भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर | ||
06 February 2024, 05:44:27 PM |
‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना | ||
04 February 2024, 05:10:08 PM |