कफ सिरप घेताय तर सावधान..!

लहान मुलांच्या जीवावर बेतल्याने ‘या’ तीन राज्यांनी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप विक्रीवर घातली बंदी

<p>कफ सिरप घेताय तर सावधान..!</p>

नवी दिल्ली - ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या सेवनाने मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ राज्यातील लहान मुलांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या तीन राज्यांनी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नऊ लहान मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर राजस्थानमध्ये देखील तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या लहान मुलांना दिलेल्या कफ सिरपमुळे दुष्परिणाम झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.