इचलकरंजी ईएसआय रुग्णालयाच्या समस्यांवर बैठक...
इचलकरंजी - इचलकरंजी हे मोठे औद्योगिक शहर असून याठिकाणचे हजारो कामगार ईएसआय सेवांवर अवलंबून आहेत. मात्र हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेक वेळा रुग्णांना तातडीने उपचार मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते, याबाबत इचलकरंजीतील शिवतीर्थ स्मारक समिती सातत्याने पाठपुरावा करते आहे.
त्यानुसार आज ईएसआय मुंबईचे संचालक अशोक थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची इचलंकरजीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हॉस्पिटलच्या नूतनीकरणासह, अपुऱ्या सोयीसुविधा, अपुरे मनुष्यबळ तसेच काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती आणि विविध समस्यांबाबत चर्चा झाली. हॉस्पिटलमध्ये लंब, सीटी स्कॅन, २-डी इको मशीन, इंडोस्कोपी, एमआरआय यासारख्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्याव्यात, आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर नेमावेत, अशा अनेक मागण्या समितीच्यावतीने करण्यात आल्या. यावेळी आधुनिकीकरण आणि सुविधा वाढीचे आश्वासन थोरात यांनी दिले.
या बैठकीला मिलिंद चौधरी, जयश्री जावडेकर, पुंडलिक जाधव, शहाजी भोसले, आनंद कांबळे, वसंत आपटे, सुनील बारवाडे आदि उपस्थित होते.