धक्कादायक : ‘या’ जिल्ह्यातील १०० गावांत एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या पोहचली ८१३ पर्यंत 

<p>धक्कादायक : ‘या’ जिल्ह्यातील १०० गावांत एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या पोहचली ८१३ पर्यंत </p>

चंद्रपूर - गेल्या तीन वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यातील १०० गावात ८१३ एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य शासनाकडून एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरु असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता संसर्ग पाहून धक्का बसला आहे. 

 गेल्या तीन वर्षांत लिंक वर्कर अंतर्गत एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७वर होती. आयसीटीसी मार्फत एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ७५६वर पोहचली आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.