‘या’ विधेयकामुळे करसवलतीच्या मर्यादेत बदल होणार..?

<p>‘या’ विधेयकामुळे करसवलतीच्या मर्यादेत बदल होणार..?</p>

नवी दिल्ली – उद्या सोमवारी वित्त मंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत नवं इनकम टॅक्स विधेयक मांडणार आहेत. त्यामुळे देशातील करसवलतीच्या मर्यादेत बदल होणार आहे.
या विधेयकामुळे 12 लाखांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत कपात होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे कि, “संपूर्णपणे नवे विधेयक आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये आधीच्या विधेयकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाणार नाही. आधीच्या विधेयकावर बरेच काम झाले आहे. मात्र, नवीन विधेयक आणताना आधीचे सगळे काम आणि वेळ वाया जाईल, अशी चिंता करण्याची गरज नाही.”