ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरणारा ‘हा’ मोबाईल होणार महाग...
मुंबई – ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरणारा तसेच ग्राहकांचा सर्वात जास्त आवडीचा असणारा Apple चा iPhone आता 3,000 ते 5,000 रुपयाने महाग होणार आहे.
Apple ने रिटेलर्सना दिला जाणारा “डिमांड जनरेशन सपोर्ट” (DG Support) अचानक मागे घेतला आहे. हा सपोर्ट रिटेलर्सना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सवलती देण्यासाठी वापरला जात होता. त्यामुळे iPhone वर डिस्काउंट मिळत होते. आता हा सपोर्ट बंद झाल्यामुळे रिटेलर्सना सवलत मिळणार नाही . त्यामुळे ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.