सर्वसामान्यांना दिलासा : सोने , चांदीच्या दरात हळूहळू घसरण
कोल्हापूर – गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात हळूहळू घसरण होवू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दराने १ लाख ६० हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले होते.
काल गुरुवारी गुढीपाडव्यानिमित्त लोकांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. काल कोल्हापुरात सोन्याचा दर १ लाख ५२ हजार ८०० होता तर आज १ लाख ४८ हजार ४०० रुपये दर झाला आहे. आज ४ हजार रुपयाने सोन्याचा दर घसरला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.