भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत गाठली नीचांकी पातळी...

<p>भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत गाठली नीचांकी पातळी...</p>

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने आतापर्यंतची सर्वात मोठी नीचांकी पातळी गाठली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 93 चा टप्पा ओलांडून 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. 
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने 'ब्रेंट क्रूड'चे दर प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या वर गेले आहेत. 

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. पैसे काढताना ते रुपयाचे रूपांतर डॉलरमध्ये करत असल्यामुळे रुपयाची घसरण आणखी वेगवान झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.