एचडीएफसी बँकेच्या चेअरमनांनी राजीनामा देताच शेअर्समध्ये मोठी घसरण

<p>एचडीएफसी बँकेच्या चेअरमनांनी राजीनामा देताच शेअर्समध्ये मोठी घसरण</p>

मुंबई - एचडीएफसी बँकेचे पार्टटाइम चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यामुळे बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे एचडीएफसीच्या गुंतवणूकदारांना 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे. 
अतनु चक्रवर्ती यांनी राजीनाम्यात म्हटले आहे की, 'गेल्या दोन वर्षांत, बँकेतील काही घटना आणि कार्यपद्धती त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी विसंगत होत्या'.