घाऊक महागाईने गाठला उच्चांक…आकडेवारी आली समोर 

<p>घाऊक महागाईने गाठला उच्चांक…आकडेवारी आली समोर </p>

मुंबई – सध्या आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे सर्वच वस्तूंचे दर हळूहळू वाढत आहेत. अशात सरकारने महागाईचा दर जाहीर केला आहे. घाऊक महागाईने फेब्रुवारीमध्ये ११ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. 
अन्नपदार्थ आणि उत्पादन क्षेत्रातील किंमतीत वाढ झाल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर २.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारीत घाऊक महागाईचा दर १.८१ टक्के होता, तो २.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे.