आता एप्रिलपासून फास्ट टॅगचे दर वाढणार...
मुंबई – सध्या युद्धाचं कारण सांगून सर्व वस्तूंमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. अशात येत्या एप्रिलपासून फास्ट टॅग महाग होणार आहे. त्या अनुषंगाने नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमांबाबत नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने निर्णय घेतला आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या वार्षिक टोल पासची किंमत 3000 रुपयांवरुन अधिक वाढवण्यात आली आहे. हे दर आर्थिक वर्ष 2026-27 साठी आहेत. हा वार्षिक पास आता 3075 रुपयांचा असणार आहे. हा पास एक वर्षासाठी वापरता येणार आहे. या एका पासमध्ये 200 वेळा टोल क्रॉसिंग करता येणार असल्याचे नवीन नियमात म्हटले आहे.