इचलकरंजी महापालिकेचा अर्थसंकल्प तयार ; स्थायी समितीकडे सुपुर्द

<p>इचलकरंजी महापालिकेचा अर्थसंकल्प तयार ; स्थायी समितीकडे सुपुर्द</p>

इचलकरंजी -  महानगरपालिकेचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रशासनाने तीन वेळा अर्थसंकल्प मांडला होता. पण यंदा लोकनियुक्त महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे अर्थसंकल्प सुपुर्द केला. हा अर्थसंकल्प सतीश मुळीक हे येणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये घरफळा, पाणीपट्टी वाढ असेल का? शहराच्या विकासासाठी काय संकल्पना असतील ? अर्थसंकल्पामधून नागरिकांचा काय फायदा होणार? अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय घोषणा होणार याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सुपुर्द करताना नगरसेवक राजू बोंद्रे, नितेश पोवार, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोल्हे, सर्व उपायुक्त यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.