आजपासून ‘या’ गोष्टी होणार महाग...
मुंबई - आजपासून २०२६ हे नवीन वर्ष सुरु होत आहे. त्या अनुषंगाने ब्युरो ऑफ एनर्जी एफिसिएन्सीचे (BEE) स्टार रेटिंग नियम आजपासून कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे एसी, फ्रीज आणि इतर कुलिंग उपकरणांच्या किंमतीत जवळपास ५ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच आज नवीन विमान इंधनाच्या किमती त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट होण्याची शक्यता आहे.