बॉलिवूडच्या 'ही-मॅन' ने घेतला अखेरचा श्वास...चित्रपट सृष्टीतून हळहळ
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे आजारी असणारे बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे त्यामुळे चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.
धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून ते घरीच होते. पण, अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.