‘मी कट्टर बीजेपी...’: भर कार्यक्रमात ‘या’ अभिनेत्रीचं वक्तव्य  

<p>‘मी कट्टर बीजेपी...’: भर कार्यक्रमात ‘या’ अभिनेत्रीचं वक्तव्य  </p>

मुंबई - काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश कोठारे यांनी, मी मोदीभक्त’ असल्याचे म्हटले होते. त्यावर त्यांच्यावर खूप टीका झाली होती आता अभिनेत्री  निवेदिता सराफ यांनी भर कार्यक्रमात, ‘मी कट्टर बीजेपी असल्याचे’ म्हटले आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. 
 
ठाण्यातील  गडकरी रंगायतन येथे अभिनेत्री निवेदिता सराफ यांना गंधार गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

निवेदिता सराफ म्हणाल्या की, आज जी मी काही आहे ते माझे गुरु, माझे पती अशोक सराफ यांच्यामुळेच आहे, आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे. आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन. मी कट्टर बीजेपी असल्याने मला खूप आनंद झाला, असे म्हणत आपण राजकीय भूमिकेतून भाजपच्या समर्थक असल्याचं निवेदिता सराफ यांनी जाहीरच करुन टाकले आहे.