‘या’ चित्रपटाने १५ व्या दिवशी ५०० कोटींचा टप्पा गाठला... अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड

मुंबई - २ ऑक्टोबर रोजी ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने १५ व्या दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. अवघ्या १५ दिवसांत ‘कांतारा – चॅप्टर १’ ने ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात एकूण ५०६.२५ कोटींची कमाई केली आहे.
हा चित्रपट २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतरही ‘कांतारा – चॅप्टर १’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करीत आहे. १५ व्या दिवशी (दुसरा गुरुवार) ‘कांतारा – चॅप्टर १’नं ८.८५ कोटी कमावले. १६ व्या दिवशी (तिसरा शुक्रवार) : ८.५ कोटी आणि १७ व्या धनत्रयोदशीच्या दिवशी (तिसरा शनिवार) कांतारा – चॅप्टर १’नं १२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.