संगीतसूर्य केशवराव भोसले कला अकादमी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना

"संगीतसूर्य ललितकलादर्श पुरस्कार २०२५" विक्रांत विजय आजगावकर यांना जाहीर

<p>संगीतसूर्य केशवराव भोसले कला अकादमी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना</p>

कोल्हापूर - संगीतसूर्य केशवराव भोसले कला अकादमी चॅरिटेबल ट्रस्टकडून पहिलाच "संगीतसूर्य ललितकलादर्श पुरस्कार २०२५" हा पुरस्कार विक्रांत विजय आजगावकर यांना आज जाहीर झालाय. येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कोल्हापुरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणारय. याबाबतची माहिती आज पत्रकार बैठकीत देण्यात आली.

मराठी नाट्यसृष्टीतील एक झळाळता तेजस्वी अध्याय म्हणजेच संगीतसूर्य केशवराव भोसले. त्यांच्या विलक्षण कलाकृतींनी संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजनच नव्हे तर भावविश्व समृद्ध केले. "माझा केशा म्हणजे तळपती तलवार आहे" असे गौरवोद्गार साक्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उच्चारले होते. या महान कलावंताच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या अमूल्य कला परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी "संगीतसूर्य केशवराव भोसले कला अकादमी चॅरिटेबल ट्रस्ट" ची स्थापना करण्यात आलीय. आगामी काळात ट्रस्ट मार्फत संगीतसूर्य कला महोत्सव, स्मृती संग्रहालय व ग्रंथालय, कला विषयक पुस्तके व ग्रंथ प्रकाशन, कला प्रशिक्षण केंद्र व शिबिरे, कलारसिकांना गौरवण्यासाठी पुरस्कार समारंभ, केशवराव भोसले यांची अभिजात नाटके पुनरुज्जीवित करणे असे विविध उपक्रम  राबविले जाणारयत. यावर्षीपासून संगीत-नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना "संगीतसूर्य ललितकलादर्श पुरस्कार" या ना वान एक नवा पुरस्कार सुरू केलाय. प्रथम पुरस्कार  मुंबईचे प्रख्यात नाट्यसंगीत गायक, रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कलाकार,प्रति बालगंधर्व विक्रांत विजय आजगावकर (प्रति बालगंधर्व) यांना जाहीर करण्यात आलाय. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि  ११,१११ रोख रक्कम असं असणारय. येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते  कोल्हापुरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणारय. याबाबतची माहिती आज पत्रकार बैठकीत देण्यात आली.

पत्रकार बैठकीला संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे पणतू व ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव भोसले, सचिव युवराज घोरपडे, अशोक पाटील (पणतू), राजशेखर भोसले (नातू), वैशाली घोरपडे (खापर पणती) व रंगकर्मी शेखर बारटक्के आदी ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.