‘भोसले’ हे आडनाव अशा प्रकारे आशा भोसलेंना मिळालं...
मुंबई – ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आठ दशकांमध्ये आपल्या आवाजाने लोकांच्या मनावर अधिराज गाजवले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात दिग्गज आणि अष्टपैलू पार्श्वगायिका त्या होत्या. त्यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,५०० हून अधिक गाणी गायली आहेत.
त्यांना जन्म संगीताचा वारसा असलेल्या मंगेशकर कुटुंबात झाला. वयाच्या नवव्या वर्षी वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी गायला सुरुवात केली. आशा भोसले यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न केले. लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी त्यांनी लग्न केले, ज्याला त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. लग्नानंतर त्यांचे आडनाव भोसले झाले. गणपतरावांपासून वेगळं झाल्यानंतरही आशा भोसले यांनी आपलं आडनाव बदललं नाही. ते त्यांची ओळख बनलं होतं आणि त्यांनी आपले हे आडनाव शेवटपर्यंत कायम ठेवले.