सुरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन...
मुंबई - सुरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन , ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.