‘या’ मराठी अभिनेत्रीने रडत रडत पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना घातली भावनिक साद...
मुलगा अडकला कुवेतमध्ये
मुंबई – सध्या आखाती देशामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सर्व विमान सेवा बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशा प्रकारे मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. त्याला परत आणण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रडत रडत मदतीची हाक दिली आहे. त्यांचा असा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा लंडनला निघाला होता. मुंबईवरुन निघालेलं त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलं. पण, आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमधील एका हॉटेलमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन केलं आहे.