‘जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर...’: निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंहचे ट्वीट

<p>‘जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर...’: निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंहचे ट्वीट</p>

मुंबई – सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. या निवृत्तीचे नेमके कारण काय असे सवाल सोशल मिडीयावरून चाहते विचारताय. यावर जवळपास महिनाभरानंतर गायक अरिजीत सिंह याने ट्वीट करून चाहत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. 
गायक अरिजीत सिंह  याने म्हटले आहे कि, “हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर कृपया हे वाचू नका. ही विनम्र विनंती आहे.”  “नमस्कार प्रिय फॅन्स, मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो. या निर्दयी जगात तुमच्या प्रेम आणि विनम्रतेबद्दल मनापासून धन्यवाद. मी नवीन असाइनमेंट्स घेणं थांबवलं असलं, तरी अजून अनेक गाणी प्रलंबित आहेत. ती एक-एक करून रिलीज होत राहतील. कदाचित संपूर्ण वर्षभर... कदाचित पुढच्या वर्षापर्यंतही.” लोकांना वारंवार समजावण्यात वेळ वाया घालवू नका, शांत राहा, स्वतःची काळजी घ्या, वाचा, प्रेम करा, ध्यान करा, असा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला आहे.