अभिनेता सलमान खानच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक...
मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानचे वडील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडल्याने काल त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याची माहिती लीलावतीच्या डॉक्टरांनी दिली आहे.
सलमान खान, आई सलमा खान, हेलन, अरबाज खान, अलविरा खान आणि अर्पिता खान यांच्यासह इतर कलाकारांनी सलीम खान यांची भेट घेतली आहे. चाहत्यांकडूनही सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.