हिरो नंबर वनने राजकारण सोडलं...
मुलांच्या भविष्यासाठी राजकारण सोडल्याचं गोविंदाचं वक्तव्य
मुंबई – सुपरस्टार हिरो नंबर वन म्हणजे अभिनेता गोविंदा आहुजाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षे खासदार राहिलेल्या आणि नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदाने राजकारणाबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे चर्चांना उधाण आले आहे.
सध्या गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आल्याने गोविंदा चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळेच गोविंदाने एका मुलाखतीत बोलताना, मुलांच्या भविष्यासाठी राजकारण सोडल्याचे म्हटले आहे.