राज्य बालनाट्य स्पर्धेत 'ठोंब्या' प्रथम तर ‘चेटकीणीच्या बंगल्यात’ द्वितीय क्रमांक
कोल्हापूर - २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून अभिरुची संस्थेच्या ठोंब्या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक ‘चेटकीणीच्या बंगल्यात’ या नाटकाने तर तृतीय क्रमांक ‘काय ते जूनं’ या नाटकानी पटकावले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे.
यामध्ये ‘जंगल स्कूल’ या नाटकाने चतुर्थ तर द कॅसलिंग या नाटकाने पाचवे पारितोषिक प्राप्त केले आहे. या पाचही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक जितेंद्र देशपांडे (नाटक- ठोंब्या), द्वितीय पारितोषिक शाहबाज गोलंदाज (नाटक- काय ते जूनं), तृतीय पारितोषिक शिरीष विचारे (नाटक-चेटकिणीच्या बंगल्यात), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- वारी), द्वितीय पारितोषिक अभिषेक कोयंडे (नाटक- लगोरी), तृतीय पारितोषिक धीरज पलसे (नाटक- द कैंसलिंग), नेपथ्य प्रथम पारितोषिक सागर सगरे (नाटक-जंगल स्कूल) द्वितीय पारितोषिक निरंजन सागवेकर (नाटक-काय ते जूनं), तृतीय पारितोषिक अरुण पाटील (नाटक-बीज अंकुरले)
रंगभूषा : प्रथम पारितोषिक सुशांत सावंत (नाटक- मैत्र जिवांचे), द्वितीय पारितोषिक सागर सगरे (नाटक- जंगल स्कूल), तृतीय पारितोषिक दिपा कोळी (नाटक- भुताचा बाप), वेशभूषा प्रथम पारितोषिक निलिमा ग्रामोपाध्ये (नाटक-राजकन्येची बाहुली), द्वितीय पारितोषिक वेदा सोनुले (नाटक-चेटकीणीच्या बंगल्यात), तृतीय पारितोषिक रमेश यळगूडकर (नाटक- आमची काय चूक ?),
संगीत दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक आर्या पोटे (नाटक-व्हॉट्सअपचा तमाशा), द्वितीय पारितोषिक हर्ष नागवेकर (नाटक-धोंड), तृतीय पारितोषिक आप्पा गावडे (नाटक-वारी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक आरव गुळवणी (नाटक- ठोंब्या) व विदुला मुळ्ये (नाटक-धोंड), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे आरोही गुळवणी (नाटक-चेटकीणीच्या बंगल्यात), स्वरा मॅडगुले (नाटक-झिम्माड झिम), विभा शिंदे (नाटक- बीज अंकुरले), सावी मुद्राळे (नाटक-लगोरी), इंद्रजा पटवर्धन (नाटक-द कैंसलिंग), अजिंक्य पोटे (नाटक-व्हॉट्सअपचा तमाशा), हितेश राजबंसी (नाटक-सर तुम्ही गुरुजी व्हा), अर्णव सरपोतदार (नाटक-काय ते जूनं), दर्शन कांबळे (नाटक-तीन पाहुणे) रियांश चव्हाण (नाटक- उंदिर मामाची जादूची दुनिया)
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गिरीश भुतकर, हनुमान सुरवसे आणि श्रीमती वैदेही चवरे यांनी काम पाहिले.