गडहिंग्लजकरांनी नव्या राजकीय समीकरणाला नाकारलं...

<p>गडहिंग्लजकरांनी नव्या राजकीय समीकरणाला नाकारलं...</p>

कोल्हापूर - महायुती मधीलच घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने गडहिंग्लज मध्ये काय होणार याची उत्सुकता होती. निवडणूकपूर्व घडामोडीत जनता दल सेक्युलरसह भाजप, जनसुराज्य आणि मित्र पक्ष एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आव्हान दिले होते . नामदार हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने येथे  मोठा विजय मिळवला आहे. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेश तुर्बतमठ यांनी बारा हजार तीनशे पन्नास मते मिळवत लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सतरा उमेदवारांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ घातली. जनता दल, भाजप शिंदे सेना - जनसुराज्यशक्ती पक्षाच्या आघाडीला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.