कोल्हापूर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती...
कोल्हापूर - महापालिका निवडणुकीसाठी महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कोल्हापूर महानगर पालिकेच्या ८१ प्रभागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ६१ जणांनी उमेदवारीची मागणी केलीय. यापैकी आज ४२ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यामध्ये उत्तर विधानसभा मतदार संघाचे शहराध्यक्ष गणेश जाधव, धनश्री जाधव, निरंजन कदम, चंद्रकांत सूर्यवंशी, राजवर्धन यादव, रूपाली बावडेकर, सादिक अत्तार, गणेश नलवडे यांच्यासह माजी नगरसेवक रमेश पोवार आणि पद्मजा तिवले यांचा समावेश आहे. एकूण ६१ इच्छुक उमेदवारांपैकी ४२ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती उद्या घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात गर्दी केली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, बाजीराव खाडे, अनिल घाटगे, पद्मजा तिवले यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आल्या.