खळबळजनक : कोल्हापुरातील ‘या’ प्रभागात भानामतीचा प्रकार...

<p>खळबळजनक : कोल्हापुरातील ‘या’ प्रभागात भानामतीचा प्रकार...</p>

कोल्हापूर – जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या  निवडणुकींतील निकालांचा जल्लोष  सुरु असताना कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये भानामतीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या  प्रभाग क्रमांक चार मधील  एका इच्छुक उमेदवाराच्या  प्रचारासाठी  छापण्यात आलेल्या जाहिरातीवर अज्ञातानं  लिंबूला टाचण्या टोचून, त्यावर हळद - कुंकू लावून , कनानगर येथे ठेवण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळं   उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे..