इचलकरंजी महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत गोंधळ...
इचलकरंजी - महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीत शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये तीस वर्षांहून अधिक काळ रहिवास असलेल्या सुमारे चारशे मतदारांची नांवे प्रभाग क्रमांक तीन मध्ये नमूद करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणातील मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाण्याच्या या प्रकारा बद्दल मतदारांसह राजकीय कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त करत आयुक्त पल्लवी पाटील यांना याची माहिती दिलीय.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांची नावं पूर्वी प्रमाणं प्रभाग क्रमांक दोन मध्येच समाविष्ट करावीत, अशी मागणी स्थानिकांनी केलीय.
यावेळी ऋषिकेश मुसळे, श्रीकांत मुसळे, रमजान मुल्ला, सचिन अहिरेकर, निवास रावळ, सोमनाथ टकले, आनंद भोसले, संदीप पाटील, दिनेश काणेकर, आकाश चोरगे, आदित्य रावळ आदि उपस्थित होते.