‘या’ महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत ठाकरे बंधूंचं एकमत...
खा. संजय राऊतांचं स्पष्टीकरण

मुंबई - मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकमत असल्याचे स्पष्टीकरण खा. संजय राऊत यांनी दिले आहे. मुंबईचा महापौर मराठी होईल, मराठी बाण्याचा माणूस होईल. मराठी बाण्याचे म्हणजे भाजपा सांगतात किंवा मिंधे सांगतात तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. हुतात्मा चौकात जाऊन आमच्या १०५ हुतात्म्यांसमोर दंडवत घालेल त्यांचाच महापौर होईल. असा बाणा फक्त शिवसेना आणि मनसेतच आहे. होईल तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह मी म्हणतो आहे, असंही खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.