राज्यात ‘या’ दोन ठिकाणी पोटनिवडणुकीची घोषणा
पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदार संघातील जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे तर ४ मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.