देशातील चार राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीचे बिगुल वाजले...
नवी दिल्ली – आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे.
आसाम ,केरळ , पुद्दुचेरी येथे ९ एप्रिल रोजी तर तामिळनाडूला २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार असून २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या सर्व विधानसभेसाठी मतमोजणी ४ मे रोजी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत यासाठी २५ लाख कर्मचारी निवडणूक कामात तैनात केली जाणार आहेत.