जिल्हा परिषद निवडणुकीत गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाचा पराभव

<p>जिल्हा परिषद निवडणुकीत गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाचा पराभव</p>

कोल्हापूर – जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी काँग्रेस सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांचा मुलगा सचिन पाटील यांना शिंदेसेनेची पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून डॉ. के. एम पाटील  आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र लक्ष्यवेधी ठरलेल्या या निवडणुकीत राजेंद्र सूर्यवंशींनी विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला आहे. पाटील यांच्या पक्षांतर नंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे त्यांचे पक्षानंतर जनतेला आवडले नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.