कागलमध्ये हसन मुश्रीफ, संजय घाटगे, समरजीत घाटगेंच्या महायुतीचा झेंडा...

<p>कागलमध्ये हसन मुश्रीफ, संजय घाटगे, समरजीत घाटगेंच्या महायुतीचा झेंडा...</p>

कोल्हापूर - कागल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सकाळी दहा वाजता कागल येथील नवोदय विद्यालयात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले आणि सहाय्यक अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरुवात झाली.

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघात १२ पैकी ११ जागांवर कब्जा मिळवला आहे. शिवसेना मंडलिक गटाला केवळ पंचायत समितीच्या एका जागेवर समाधान मानावे लागले. बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादीच्या शोभा फराकटे यांनी ५ हजार ६३६ मतांनी विजय मिळवत बंडखोरीला छेद दिला. कापशी मतदार संघात राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांनी ४ हजार १४० मतांनी विजय संपादन केला तर चिखली मतदार संघात भाजपच्या शिवानी भोसले या २ हजार २१३ मतांनी विजयी झाल्या. महायुतीने सहाही जागांवर विजय मिळवला असून पंचायत समितीच्या म्हाकवे मतदार संघात भाजपचे काकासाहेब सावडकर यांनी शिवानंद माळी यांचा २ हजार २९६ मतांनी पराभव केला. सिद्धनेर्ली मतदार संघात सुयशा घाटगे यांनी तब्बल ७ हजार ४५९ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. पंचायत समितीच्या बोरवडे गणात शिवसेनेचे बालाजी फराकटे यांनी भाजपचे संभाजी फराकटे यांचा केवळ ४५४ मतांनी निसटता पराभव केला. इतर बहुतांश गणांमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. दुसरीकडे शिवसेना मंडलिक गट, उबाठा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही.