कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतमोजणीला सुरुवात...

<p>कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतमोजणीला सुरुवात...</p>

कोल्हापूर – आज कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी तर १३६  पंचायत समितींच्या जागांसाठी निकाल जाहीर होत आहे. त्यानुसार निवडणूक प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे काही वेळात जिल्ह्यातील आघाडीचे आकडे यायला हळूहळू सुरुवात होत आहे. 
 

  • गगनबावडा तालुक्यातील टपाल मत मोजणीमध्ये असळज आणि  तिसंगी जिल्हा परिषद तर  तिसंगी ' असळज '  धुंदवडे ' असंडोली पंचायत समितीत पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमदेवार आघाडीवर आहेत.
  • दानोळी जिल्हा परिषद मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार नंदिनी संदीप कांबळे या टपाली मतांमध्ये आघाडीवर...
  • भुदरगड तालुक्यातील कडगाव जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या सारिका यशवंत उर्फ बाबा नांदेकर या पहिल्या फेरी अखेर 600 मतांनी आघाडीवर...
  • गगनबावडा तालुक्यात असळज व तिसंगी जिल्हा परिषद  तसेच 'तिसंगी  'असळज'  'धुंदवडे ' असंडोली पंचायत समितीमध्ये  काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या  फेरीतही आघाडीवर...
  • आलास पंचायत समिती मतदार संघात भाजपचे प्रशांत शहापूरे आघाडीवर...
  • गणेशवाडी पंचायत समिती मतदार संघात महाविकास आघाडीच्या जयश्री मानकापूरे आघाडीवर...
  • गगनबावडा तालुक्यात असळज व तिसंगी जिल्हा परिषद  तसच' तिसंगी ' असळज '  धुंदवडे ' असंडोली पंचायत समितीमध्ये  कॉग्रेसचे उमेदवार तिसऱ्या  फेरीतही आघाडीवर...
  • शिरोळ तालुका दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसच्या राधा पाटील आघाडीवर...
  • सातवे सावर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर...
  •  घुनकी  जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार, घुणकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या संगीता पाटील आणि  नवे पारगाव पंचायत समिती काँग्रेसचे भारत पाटील  विजयी
    (मात्र जिल्हा परिषद मतदार संघात फेर मतमोजणीची मागणी)
  • शिरोळ तालुक्यात दत्तवाड जिल्हा परिषदमधून महाविकास आघाडीच्या दिपाली उर्फ राधा पाटील तर आलास जिल्हा परिषद मधून काँग्रेसचे आय आय पटेल तर यड्राव जिल्हा परिषदमधून काँग्रेसच्या अर्चना चौगुले आघाडीवर...
  • पन्हाळा तालुक्यातील सातवे पंचायत समिती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिक पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर...
  • राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसचे सागर धुंदरे पहिल्या फेरी अखेर 458 मतांनी आघाडीवर...
  • पन्हाळा तालुक्यातील सातवे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीचे डॉ. जयंत पाटील, सातवे पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचे माणिक पाटील, माले पंचायत समितीमधुन राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी...
  • शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषदमध्ये  काँग्रेसच्या दिपाली पाटील या आठव्या फेरी अखेर आघाडीवर...
  • शिरोळ तालुक्यात दत्तवाड पंचायत समिती मधून महाविकास आघाडीचे बंडू चौगुले विजयी
  • करवीर मधील शिये जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसचे विश्वनाथ पाटील विजयी
  • करवीर - वडणगे पंचायत मतदार संघातून शिंदे सेनेचे बळी कळके आघाडीवर...
  • करवीर - वडणगे जिल्हा परिषद शिवसेना शिंदे गटाचे इंद्रजीत  पाटील सहाव्या फेरी अखेर आघाडीवर...
  • गगनबावडा तालुक्यातील असळज व तिसंगी जिल्हा परिषद तसेच तिसंगी ' असळज ' धुंदवडे ' असंडोली पंचायत समितीमध्ये आठव्या  फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर...
  • पन्हाळा तालुक्यातील सातवे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादीचे  डॉ. जयंत पाटील विजयी
  • सातवे पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे माणिक पाटील विजयी
  • माले पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे भारती पाटील विजयी
  • हातकणंगले तालुक्यातील घुणकी जिल्हा परिषद  मतदार संघातून काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार विजयी
  • नवे पारगाव पंचायत समितीतून काँग्रेसचे भारत पाटील विजयी
  • घुणकी पंचायत समिती मतदार संघातून जनसुराज्यच्या कल्याणी मोहिते विजयी
  • शिरोळ तालुक्यातील  दत्तवाड पंचायत समितीमधून महाविकास आघाडीचे  बंडू चौगुले विजयी
  • राधानगरी राशिवडे पंचायत समिती मधून काँग्रेसच्या अमृता पाटील विजयी
  • धामोड पंचायत समिती  मधून शिवसेना शिंदे गटाचे के .एल. पाटील विजयी
  • दुसऱ्या फेरी अखेर चंदगड तालुक्यातील चार गटांपैकी अडकुर गटात भाजप आघाडीवर...
  • माणगाव, कुदनुर, तुडये गटामध्ये राष्ट्रवादी आघाडीवर...
  • शिरोळ तालुक्यातील उदगाव जिल्हा परिषद मतदार संघात राजर्षी शाहू आघाडीचे अमोल चव्हाण 571 मतांनी आघाडीवर...
  • शिरोळ तालुक्यातील दानोळी जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडीच्या नंदिनी कांबळे आघाडीवर...
  • हातकणंगले तालुक्यातील भादोले जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी
  • भादोले पंचायत समिती मतदार संघातून काँग्रेसचे कपिल पाटील विजयी
  •  टोप पंचायत समिती मतदार संघातून जनसुराज्यचे मुकुंद पाटील विजयी
  • करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसचे सुदर्शन खोत आघाडीवर...
  • गगनबावडा तालुक्यातील असंडोली पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या छाया देसाई विजयी
  • करवीर तालुक्यातील पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातून पोस्टल मतामध्ये काँग्रेसचे संग्राम पाटील आघाडीवर...

आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ६८ जागांपैकी काँग्रेस १२, राष्ट्रवादी १०, भाजप ७  तर शिंदे सेना ६ जागांवर विजयी

  • राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अमृता अरुण डोंगळे या पहिल्या फेरी अखेर 1166 मतांनी आघाडीवर...
  • गगनबावडा तालुक्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी घोषीत
  • करवीर तालुक्यातील निगवे दुमाला पंचायत समिती मतदार संघातून  शिंदे सेनेच्या रूपाली कुर्ले विजयी
  • कागल तालुक्यातील बोरवडे पंचायत समितीमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार बालाजी फराकटे 454 मतांनी विजयी
  • गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचे शिवगोंडा पाटील विजयी
  • करवीर तालुक्यातील उचगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे नामदेव  वाईंगडे विजयी
  • शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट जिल्हा परिषद मतदार संघातील राजर्षी शाहू आघाडीच्या श्रध्दा गायकवाड या  तेराव्या फेरी अखेर आघाडीवर...
  • सिद्धनेर्ली तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपच्या सुयशा घाटगे विजयी
  • सिद्धनेर्ली पंचायत समितीमधून भाजपच्या पाटील सुवर्णा शशिकांत विजयी
  • साके पंचायत समितीमधून भाजपचे दंडवते दत्तात्रय रावण विजयी
  • कागल तालुक्यातील  चिखली जिल्हा परिषदेत भाजपच्या शिवानी भोसले विजयी  
  • चिखली पंचायत समितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुवर्णा जाधव विजयी 
  • हळदी पंचायत समितीमध्ये भाजपच्या मनिषा विलास विजयी
  •  कागल तालुक्यातील कापशी जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत विजयी
  • कापशी पंचायत समितीमध्ये भाजपच्या सुनीता माळी विजयी  
  • माद्याळ पंचायत समितीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दीपक सोनार  विजयी
  • पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेत अपक्ष उमेदवार अमर भाऊ पाटील विजयी
  • कोडोली पूर्व पंचायत समितीमध्ये जनसुराज्यचे रणजीत शिवाजी शिंदे विजयी
  • कोडोली पश्चिम पंचायत समितीमधून अपक्ष उमेदवार मोहन शामराव चोपडे विजयी
  • कागल तालुक्यातील म्हाकवे जिल्हा परिषदेत भाजपचे काकासो सावडकर विजयी
  • म्हाकवे पंचायत समितीमध्ये भाजपच्या रंजना अस्वले विजयी
  • यमगे पंचायत समितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रूपाली आंगज विजयी
  • हातकणंगले तालुक्यातील कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात जनसुराज्यच्या शीतल यादव विजयी
  • लाटवडे पंचायत समितीमध्ये जनसुराज्यचे मोहन पाटील विजयी 
  • करवीर तालुक्यातील वडणगे जिल्हा परिषदेत शिंदेच्या शिवसेनेचे इंद्रजित पाटील विजयी 
  • वडणगे पंचायत समितीमध्ये  शिंदेच्या शिवसेनेचे बळीराम कळके विजयी 
  • खुपिरे पंचायत समितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आशा पाटील विजयी
  • करवीर तालुक्यातील  शिये पंचायत समितीमधून काँग्रेसच्या उमेदवार उमा पाटील विजयी
  • शिरोळ तालुक्यातील आलास जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे प्रशांत शहापूरे विजयी
  • आलास पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे फैजल पाटील विजयी
  • गणेशवाडी पंचायत समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजश्री माणकापूरे विजयी

कागल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि भाजपाचे तीन जिल्हा परिषद सदस्य विजयी...

  • हातकणंगले तालुक्यातील शिरोली जिल्हा परिषदमधून भाजपचे सलीम महात विजयी
  • शिरोली पंचायत समितीमध्ये भाजपचे कमल प्रकाश कौदाडे विजयी
  • नागाव पंचायत समितीमधून भाजपचे अरुण माळी विजयी
  • पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातून पाचव्या फेरी अखेर राष्ट्रीय काँग्रेसचे संग्राम पाटील 175 मतांनी आघाडीवर...
  • शिरोळ तालुक्यातील उदगाव जिल्हा परिषदेचे राजर्षी शाहू विकास आघाडीचे अमोल चव्हाण विजयी
  • अर्जुनवाड पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सीमा म्हैशाळे विजयी
  • उदगाव पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या दिप्ती जाधव विजयी
  • शिरोळ तालुक्यातील यड्राव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसच्या अर्चना चौगुले विजयी
  • यड्राव पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रतिक पाटील विजयी
  • शिरढोण पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या सायली मालगावे विजयी
  • शिरोळ तालुक्यातील नांदणी जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचिता कोळी विजयी
  • नांदणी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या निलम म्हेत्रे विजयी
  • चिपरी पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रविण देसाई विजयी
  • अब्दुल्ललाट जिल्हा परिषद मतदार संघात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या श्रद्धा गायकवाड विजयी
  • अब्दुल्ललाट पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे मिलिंद कुरणे विजयी
  • अकिवाट पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे नाना उपाध्ये विजयी
  • राधानगरी तालुक्यात कसबा वाळवे जिल्हा परिषदेत शिंदेच्या शिवसेनेचे अरुण जाधव विजयी
  • तुरंबे पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे वंदना चंद्रकांत उर्फ बबन जाधव विजयी
  • कसबा वाळवे पंचायत समितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मंगल कांबळे विजयी
  • करवीर तालुक्यातील वसगडे पंचायत समितीमधून काँग्रेसच्या अनिता कांबळे विजयी
  • पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान पाटील विजयी  
  • वाडी रत्नागिरी पंचायत समितीमध्ये जनसुराज्यच्या मनीषा पाटील विजयी
  • पोर्ले तर्फ ठाणे पंचायत समितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उज्वला सासणे विजयी
  • यड्राव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसच्या अर्चना चौगुले विजयी
  • यड्राव पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रतिक पाटील विजयी
  • शिरढोण पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीच्या मनिषा रणजीत कदम विजयी
  • राधानगरी तालुक्यातील सरवडे जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या संयोगिता रणधीर मोरे पहिल्या फेरीत आघाडीवर...

दुपारी दीडपर्यंतचा निकाल : एकूण जाहीर निकाल - ३४

काँग्रेस ०८, भाजप ०७,राष्ट्रवादी ०६, शिंदेसेना ०६, यड्रावकर शाहू आघाडी ०४, जनसुराज्य ०२, अपक्ष ०१

  • करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ ठाणे पंचायत समितीमधून काँग्रेसचे अनिल मेत्रे विजयी
  • करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली पंचायत समितीमधून भाजपच्या राजश्री पाटील 155 मतांनी विजयी (फेर मतमोजणीची मागणी)
  • पाचगावमधून जिल्हा परिषदेचे कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील विजयी
  • सरवडे जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसच्या संयोगिता रणधीर मोरे विजयी
  • सोळांकूर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे राजेंद्र यशवंत पाटील विजयी 
  • नरतवडे पंचायत समिती मतदार संघात काँग्रेसचे सूर्यकांत पाटील विजयी 
  • हातकणंगले तालुक्यातील रुकडी जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे आतिष शिंदे विजयी
  • हेरले पंचायत समितीमधून शिवसेनेचे सचिन जाधव विजयी  
  • रुकडी पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या माया लोखंडे विजयी
  • हातकणंगले तालुक्यातील रूई जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसचे राहूल आवळे विजयी
  • रूई पंचायत समितीमध्ये भाजपच्या अश्विनी पवार विजयी
  • माणगाव पंचायत समितीमध्ये भाजपच्या मीनल मगदूम विजयी
  • करवीर तालुक्यातील शिये पंचायत समितीमधून काँग्रेसच्या उमा पाटील विजयी 
  • खुपीरे पंचायत समितीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पाटील विजयी 
  • वळीवडे पंचायत समितीमधून भाजपचे रविलाल मल्लानी विजयी 
  • मुडशिंगी मतदार संघातून भाजपच्या पूनम कांबळे विजयी 
  • पन्हाळा तालुक्यातील ​यवलुज जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पूजा पाटील विजयी
  • यवलूज पंचायत समितीमध्ये जनसुराज्यच्या वैशाली आडनाइक विजयी
  • वाघवे पंचायत समितीमध्ये जनसुराज्यच्या शोभा पाटील विजयी
  • कोरोची जिल्हा परिषदेत भाजपच्या सानिका आवाडे विजयी
  • कोरोची पंचायत समितीमध्ये भाजपच्या सुमेघ ओऊळकर विजयी
  • तारदाळ पंचायत समितीमध्ये भाजपच्या प्रियांका खोबरे विजयी
  • तिसऱ्या फेरी अखेर करवीर तालुक्यातील शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसच्या रसिका पाटील 1648 मतांनी आघाडीवर...
  • करवीर तालुक्यातील उजळाईवाडी पंचायत समिती मतदार संघातून काँग्रेसच्या डॉ. शिल्पा हजारे विजयी
  • राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रीय काँग्रेसचे अभिजित तायशेटे विजयी 
  • राधानगरी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या अश्विनी चंद्रकांत चौगले विजयी
  • फेजिवडे पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे मोहन दिनकर पाटील विजयी
  • करवीर तालुक्यातील निगवे खालसा जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसचे एकनाथ पाटील 656 मतांनी विजयी
  • शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसच्या रसिका पाटील विजयी
  • हातकणंगले तालुक्यातील कबनूर जिल्हा परिषदेत भाजपचे कुमार कांबळे विजयी
  • कबनूर पूर्व पंचायत समितीमध्ये भाजपच्या गौराबाई काडाप्पा विजयी
  • कबनूर पश्चिम पंचायत समितीमध्ये भाजपचे प्रकाश पाटील विजयी
  • पन्हाळा तालुक्यातील कोतोली जिल्हा परिषदेचे शिवसेनेच्या वर्षाराणी पाटील विजयी
  • कोतोली पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे अण्णासाहेब गायकवाड विजयी
  • बाजार भोगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे दत्तात्रय खोत विजयी