निवडे- साळवणच्या सभेला लोकांची अलोट गर्दी...
सामान्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या वृत्तीचा सन्मान करा :आ. सतेज पाटील
कोल्हापूर – काँग्रेसचे उमेदवार हे सामान्य लोकांच्या मदतीला धावून येणारे आहेत. त्यांच्या या वृत्तीचा सन्मान करा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले. तिसंगी जिल्हा परिषदेच्या उमेदवार अॅड. सोनाली विलास पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार छाया प्रकाश देसाई, तिसंगी पंचायत समितीचे उमेदवार अमर केशव कांबळे यांच्या प्रचारार्थ निवडे - साळवण येथील जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, बी. डी. कोटकर, संचालक चंद्रकांत खानविलकर, मानसिंग पाटील, बंडाआप्पा पडवळ, महादेव पडवळ, रामचंद्र बोभाटे, सहदेव कांबळे, संजय पडवळ, रामचंद्र पाटील, रामचंद्र जाधव, दत्तात्रय पाटील, सुभाष पाटील, सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पाटील, गोकुळ संचालक बयाजी शेळके, संजय पाटील- किरवेकर, माजी सभापती बंकट थोडगे, विलास पाटील, शामराव हंकारे, पांडुरंग भोसले, बाळासो कांबळे, प्रकाश देसाई, श्रीकांत पाटील, डी.जे. पाटील, दगडू जाधव, पी. डी. जाधव, बापू शेटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.