दुटप्पी सरकारचा ढोंगीपणा ओळखा : कोगेतील सभेत आ. पाटील यांचे आवाहन 

<p>दुटप्पी सरकारचा ढोंगीपणा ओळखा : कोगेतील सभेत आ. पाटील यांचे आवाहन </p>

कोल्हापूर - लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागतील म्हणून आता केवायसीची अट घालत आहेत. अशा दुटप्पी भाजप सरकारचा ढोंगीपणा ओळखा आणि त्यांना चांगली अद्दल घडवा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले. करवीर तालुक्यातील कोगेच्या जाहीर सभेत ते बोलत होते.  
पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉ. के. एन. पाटील, हिंदुराव कांबळे आणि एड. तुषार पुजारी यांच्या प्रचारार्थ कोगे येथे जाहीर सभा घेण्यात आली. राज्यातील सरकार शक्तीपीठ, वीज दरवाढ, स्मार्ट मीटर अशा माध्यमातून सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा घणाघात आ. सतेज पाटील यांनी केला.
यावेळी पांडुरंग डाफळे, उदयानी साळुंखे, बबनराव रानगे, आंबुताई पाटील, सर्जेराव घरात, जयसिंग पाटील, किरण पाटील, सरिता सासणे, संभाजी पाटील, डी. आर. बुगडे, धनंजय खाडे, दिनकर पाटील, सुभाष पालकर, संदीप पाटील यांच्यासह पाडळी खुर्द मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.