जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध : बालिंगामधील प्रचार सभेत आ. सतेज पाटील यांची ग्वाही 

<p>जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध : बालिंगामधील प्रचार सभेत आ. सतेज पाटील यांची ग्वाही </p>

कोल्हापूर - काँग्रेसने नागरिकांच्या प्रश्नांवर नेहमीच न्याय भुमिका घेतली आहे. सरकारच्या अपयशी धोरणांवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध, असल्याची ग्वाही आ. सतेज पाटील यांनी दिली.
शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या उमेदवार रसिका पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार लता माने आणि रवींद्र पाटील यांच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील बालिंगा येथे सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  
या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळून जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, मानसिंग बोंद्रे, अतुल बोंद्रे, एम. एस. भवड, अनिल पवार, पंकज कांबळे, दादूमामा कामिरे, राजेंद्र चौगुले, तानाजी निगडे, बाबासो दिवसे, पांडुरंग वाडकर, दिगंबर पाटील, विलास तोडकर, विश्वास कामिरे, उत्तम निगडे, मोहन कांबळे, बाळासाहेब पाटील, अजय भवड, विशाल जांभळे, मंगेश पाटील, प्रकाश माळी, मारुती माने, अंजना माळी, दीपक माळवदे, धनंजय ढेंगे, शुभांगी सावंत, नंदकुमार जांभळे, प्रशांत शिंदे, विनायक कांबळे, यशवंत बँक चेअरमन महेश पाटील, सरपंच सुधाताई बीडकर, अमित पाटील, स्वाती पाटील, यशवंत बँक संचालक एम. एस. पाटील  यांच्यासह मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.