निगवे दुमालाच्या जाहीर सभेत आ. सतेज पाटील यांनी जि.प. अध्यक्षाबाबत व्यक्त केला विश्वास  

करवीरकरांच्या ताकदीवरच जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष बसवणार : आ. सतेज पाटील 

<p>निगवे दुमालाच्या जाहीर सभेत आ. सतेज पाटील यांनी जि.प. अध्यक्षाबाबत व्यक्त केला विश्वास  </p>

कोल्हापूर – करवीरकरांच्या प्रेमाच्या जोरावर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष बसवणार यात काही शंका नसल्याचा विश्वास आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. 
शिये जिल्हा परिषदेचे  उमेदवार विश्वनाथ विलास पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार उमा अमित पाटील आणि साक्षी सौरभ कुंभार यांच्या प्रचारार्थ निगवे दुमाला येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. 

यावेळी बोलताना आ. सतेज पाटील यांनी, या करवीर मतदारसंघाने माझ्या राजकारणाला आकार दिला. या तालुक्यामुळे माझी राज्यभरात ओळख आहे. भविष्यातही करवीर तालुक्यातील नागरिक लढण्यासाठी मला असेच पाठबळ देतील, असा आत्मविश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या जाहीर सभेवेळी निगवे दुमालामधील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.