दिंडनेर्लीत ऋतुराज पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग...
कोल्हापूर – कळंबे तर्फ ठाणे जिल्हा परिषदेच्या उमेदवार मनीषा अरुण पाटील आणि दिंडनेर्ली पंचायत समितीच्या उमेदवार सुजाता मनीष नरके यांच्या प्रचारार्थ दिंडनेर्ली येथे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी जाहीर सभा घेतली. या सभेला ग्रामस्त मोठ्या संख्येन उपस्थित होते.
यावेळी ठिकठिकाणी संवाद साधताना ऋतुराज पाटील यांनी दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी माजी सरपंच संभाजी बोटे, शांताराम बोटे, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय परीट, आण्णा बोडके, अनिल मुळीक, आर.बी. कांबळे, कृष्णात पडळे, केरबा पाटील, नाना बेनके, अरुण बोडके, धनाजी बेनके, नवनाथ मुळीक, कृष्णात मगदूम, सदाशिव निकम, अनिल खोत, काशिनाथ पोवार, बाळू कात्रे, दत्तात्रय जाधव, भगवान कोईगडे, बाळासो मेटील, संदीप पाटील, हंबीरराव वाडकर, माजी उपसरपंच उमेश पाटील, राजू चौगले, उदय भोसले, सर्जेराव कालुगडे, निवृत्ती पाटील, एन.के. पाटील, आर.डी. शिंदे, भैरीनाथ बोटे, दयानंद जंगम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.