भादोले मतदार संघात काँग्रेसला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हिच यशाची खात्री : आ. सतेज पाटील
वाठारमध्ये आ.सतेज पाटील, राजू शेट्टींची पदयात्रा...
कोल्हापूर – भादोले मतदार संघात काँग्रेसला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हिच यशाची खात्री असल्याचे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले. वाठार येथील पदयात्रेदरम्यान ते बोलत होते.
भादोले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे आ. सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा काँग्रेसचा विचार आणि सामाजिक न्यायाची भूमिका मतदारापर्यंत पोहोचवण्यात आली.
भादोले जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सोनाली राहुल सावंत, भादोले पंचायत समितीचे उमेदवार कपिल धोंडीराम पाटील, टोप पंचायत समितीचे उमेदवार उत्तम शहाजी पाटील यांच्यासह भादोले मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.