शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवूया...

आ.सतेज पाटील यांचे घुणकीमध्ये आवाहन 

<p>शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवूया...</p>

कोल्हापूर – मोदी सरकारने भारत- अमेरिका व्यापार करार करून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, अशा भाजप सरकारला धडा शिकवूया, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले आहे. 
घुणकी जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगिता कुंभार, नवे पारगाव पंचायत समितीचे उमेदवार भारत पाटील, घुणकी पंचायत समितीच्या उमेदवार संगिता पाटील यांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या विरोधात काम करणाऱ्या मोदी सरकारने भारत - अमेरिका व्यापार करून अमेरिकन कृषी उत्पादनांसाठी भारतीय मार्केट खुले केले आहे. याचा दूरगामी परिणाम देशातील कृषी व्यवसायावर होऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहे. या अन्यायकारक धोरणांच्या विरोधातील लढाईत काँग्रेसला मतदान करून भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले केले. 
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, ज्येष्ठ नेते प्रकाश शेंडगे यांनी मतदारांना संबोधित केले. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, आनंदराव पाटील,  केशव जाधव, सुधीर मगदूम, अण्णा मगदूम, जयसिंग कुरणे, एच.पी. पाटील, सागर मोहिते, नवनाथ पाटील, विलास जाधव, नामदेव गिरी, धीरज पवार, मच्छिंद्र पाटील, धनाजी पाटील, बाजीराव पाटील, सुहास पाटील, प्रल्हाद पाटील, माजी सभापती आक्काताई पाटील, अमित घोरवडे, रमेश पाटोळे, तानाजी जाधव यांच्यासह हातकणंगले तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.