स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढीसारख्या चुकीच्या धोरणाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या 

आ. सतेज पाटील यांचे भादोलेत प्रतिपादन 

<p>स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढीसारख्या चुकीच्या धोरणाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या </p>

कोल्हापूर – राज्यातील लोक वीज दरवाढीने मेटाकुटीला आले आहेत. त्यातच आता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. या विरोधात आम्ही लढत आहोत. सरकारच्या अशा धोरणाविरोधात आपल्याला ताकदीने लढाई करायची आहे. त्यासाठी काँग्रेसचे हात बळकट असणे गरजेचे असल्याचे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले. जाहीर सभेत ते बोलत होते. 
भादुले जिल्हा परिषदेचे उमेदवार सोनाली राहुल सावंत, भादोले पंचायत समितीचे उमेदवार कपिल धोंडीराम पाटील, टोप पंचायत समितीचे उमेदवार उत्तम शहाजी पाटील यांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी काँग्रेसचे माजी खासदार जयवंत आवळे, माजी आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.  

यावेळी धोंडीराम पाटील, मनोज माने, माजी सरपंच आनंदा कोळी, राजवर्धन पाटील, गब्बर पाटील, रूपाताई वायदंडे, प्रमोद कुंभार, अमोल कुंभार, गजेंद्र सुतार, अमर पाटील, सुवर्णाताई धनवडे, पांडुरंग पाटील, धमाजी पाटील, सुधीर मगदूम, वैभव भोसले, सागर चोपडे, अनिल जामदार यांच्यासह भादोले मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.