हलसवडेमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा प्रचार दौरा...
कोल्हापूर - गोकुळ शिरगांव जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सुदर्शन खोत आणि वसगडे पंचायत समितीच्या उमेदवार अनिता कांबळे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील हे करवीर तालुक्यातील हलसवडे येथे आले होते. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, उपसरपंच मोहन खोचगे, शिवाजी दांडगे, बाळासाहेब पाटील, बाळासो पळशे, महेश स्वामी, महेश कांबळे, जगदिश साळुंखे, विजय पाटील, वैभव पाटील, योगेश पाटील, मिलींद भोसले, शेखर पाटील, बाळासो खोचगे, कोंडीराम चौगले, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.