जनतेच्या आशिर्वादाने अन् साथीने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचाच..! 

तारळेच्या जाहीर सभेत आ. सतेज पाटील यांची ग्वाही 

<p>जनतेच्या आशिर्वादाने अन् साथीने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचाच..! </p>

कोल्हापूर – जनतेच्या आशिर्वादाने आणि साथीने या निवडणुकांमध्ये विजय मिळवून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, अशी ग्वाही  आ. सतेज पाटील यांनी दिली. जाहीर सभेत ते बोलत होते. 
कसबा तारळे जिल्हा परिषदेच्या उमेदवार भाग्यश्री धीरज डोंगळे, कसबा तारळे पंचायत समितीचे उमेदवार दिपक पाटील, कौलव पंचायत समितीच्या उमेदवार स्वाती चरापले यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील तारळे येथे जाहीर सभा घेण्यात आली.  

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, दत्तात्रय पाटील, ए. डी. पाटील, ए.डी. चौगुले, संजयसिंह पाटील, सदाशिव चरापले, विश्वनाथ पाटील, वसंतराव पाटील, बाजीराव चौगुले, रवींद्र पाटील, धीरज डोंगळे, शिवाजी पाटील, दिगंबर येरुडकर, बंडोपंत रावमा बुगडे, जितेंद्र कवडे, विठ्ठल कांबळे, ज्ञानदेव पाटील, संदीप पाटील, पांडुरंग कांबळे, साताप्पा कांबळे, मानसिंग पाटील, मोहन डवरी, अभिजीत पाटील, डॉ. सर्जेराव कवडे, अमर पाटील, एम. आर. कांबळे, चंद्रकांत पाटील, संदीप ढवळे, डी. बी. पाटील, मोहन धोंद्रे, वैभव तहसीलदार, संजय पाटील, दत्ता पाटील, दिनकरराव पाटील, पांडुरंग कांबळे  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.