आपली हयात घालवलेल्या काँग्रेस निष्ठावंतांच्या कार्याचा सन्मान करण्याची हिच संधी : आ.सतेज पाटील
कसबा वाळवेतील जाहीर सभेत मतदारांना केलं संबोधित
कोल्हापूर - काँग्रेसच्या विचारांसाठी तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना हिंदुराव चौगले यांनी आपली संपुर्ण हयात घालवली. जनतेची कामी करणारे आणि जनसामान्यांना आपला माणूस वाटणारे चौगले कुटुंबियांच्यात काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. काँग्रेस विचारांसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या निष्ठावंतांच्या कार्याचा सन्मान करण्याची हिच संधी असल्याचे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले आहे.
कसबा वाळवे जिल्हा परिषदेचे उमेदवार सुनील हिंदुराव चौगले, कसबा वाळवे पंचायत समितीच्या उमेदवार साधना अनिल तराळ, तुरुंबे पंचायत समितीच्या उमेदवार वंदना बबन जाधव यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिव चरापले, दत्तात्रय पाटील, शुभम पाटील, यमाजी तराळ यांच्यासह प्रभाकर पाटील, सरपंच बी. एस. पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, बबन जाधव, प्रकाश खाडे, तानाजी चव्हाण, राजेंद्र यादव, स्वाती पाडळकर, कुंडलिक पाडळकर, रघुनाथ जठार, तानाजी चव्हाण, राहुल हातकर, तानाजी काटकर, सदाशिव बांदिगरे, अॅड. विनोद मुसळे, दत्तात्रय मनुगडे, संजय पाटील, तानाजी खोत यांच्यासह कसबा वाळवेतील ग्रामस्थ उपस्थित होते.