मोरे कुटुंबियांचा सामाजिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्यावरच : आ. सतेज पाटील 

सरवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रचारसभा 

<p>मोरे कुटुंबियांचा सामाजिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्यावरच : आ. सतेज पाटील </p>

कोल्हापूर - आर. के. मोरे यांच्या निधनाने मोरे कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. मोरे कुटुंबियांचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता तुम्हां- आम्हांवर असल्याची ग्वाही आ. सतेज पाटील यांनी दिली. सरवडे जिल्हा परिषदेचे उमेदवार संयोगिता रणधीर मोरे, सरवडे पंचायत समितीचे उमेदवार सूर्यकांत आनंद पाटील, सोळंंकुर पंचायत समितीचे राजेंद्र यशवंत तथा आर. वाय. पाटील यांच्या प्रचारार्थ सरवडेमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  


यावेळी बोलताना आ. सतेज पाटील यांनी, मोरे कुटुंबियांच्या कठीण काळात तसेच भविष्यात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा रहा. यासाठी या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करणे हिच त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल, अशी भावनिक साद त्यांनी घातली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, सरपंच रणधीरसिंह मोरे, हिंदुराव चौगले, सदाशिव चरापले, शामराव देसाई, डी. एस. पाटील, नेताजी पाटील, अविनाश पाटील, डी.के. मोरे, शरद पाडळकर, आनंदा पाटोळे, बाजीराव पाटील, विलास खोराटे, दिग्विजयसिंह मोरे, प्रवीणसिंह मोरे, विक्रमसिंह मोरे, दत्ता राऊत, रंगराव पाटील, राजेंद्र पाटील, दामूअण्णा वाघवेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील मतदार उपस्थित होते.