एकनिष्ठ कार्यकर्ता भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी असल्याने विजय निश्चित : आ सतेज पाटील

यवलूज येथे उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा

<p>एकनिष्ठ कार्यकर्ता भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी असल्याने विजय निश्चित : आ सतेज पाटील</p>

कोल्हापूर – राजकारण काहीही होऊ दे सामान्य कार्यकर्ता हा कायम काँग्रेसशी एकनिष्ठ राहीलाय. त्याची प्रचिती यवलूज परिसरात येत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी नमूद करत एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरावर विजयाची खात्री असल्याचा विश्वास त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला आहे.

यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार त्रिवेणी पाटील, यवलूज पंचायत समितीच्या उमेदवार स्मिता भुयेकर 'आणि वाघवे पंचायत समितीच्या उमेदवार अनिता पवार यांच्या प्रचारासाठी पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथे जाहीर सभा घेण्यात आली.

 या सभेत बोलताना आ सतेज पाटील यांनी, 'स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या माघारी काँग्रेस कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये जिवाचे रान केल्याचे सांगितले. काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष निवास पाटील यांनी, काँग्रेस पक्ष हा पन्हाळा तालुक्यात रुजलेला पक्ष असून त्याला उर्जितावस्था आणण्यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पा. वी. पाटील, दादासो पाटील, प्रसाद पाटील यांनीही मनोगतं व्यक्त केली.

या सभेला गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, बयाजी शेळके,  संजय कांबळे, अनिल जाधव, राहुल कांबळे, सागर भोमकर, सदाशिव बुवा, प्रवीण पवार, सरदार शिंदे, जयदीप यादव, तानाजी जगताप, बाजीराव भुयेकर, विजय जाधव, सर्जेराव हिरवे, बजरंग जांबिलकर, राहुल पाटील, अनिल पाटील, देवास पाटील, सतीश चौगुले, अमर गायकवाड, संजय पाटील, बंडोपंत पाटील, सुरेश बांबवडेकर, ताजुद्दीन मुल्लाणी, हनुमंत उडाळे, दादासाहेब पाटील, पोर्ले तर्फ ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार विलास चेचर यांच्यासह यवलूज मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.