सामान्य जनतेसाठी लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या पाठीशी रहा : आ. सतेज पाटील
उमेदवारांच्या प्रचारार्थ अब्दुललाटमध्ये जाहीर सभा
कोल्हापूर – महाविकास आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी लढाई लढत आहे. या निवडणुकीत सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं रहा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले आहे.
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट जिल्हापरिषद मतदार संघात महाविकास आघाडीकडून स्वाती मधाळे , अब्दुललाट पंचायत समितीमधून अभिजित मोहिते तर अकिवाट पंचायत समितीमधून बाळसिंग रजपूत निवडणुक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ अब्दुललाट मधील जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी आरपीआयने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी मधुकर पाटील, पृथ्वीराज यादव, सचिन शिंदे, विश्वजीत कांबळे, दरगू गावडे, शेखर पाटील, शितल अवघडी, माजी सरपंच आण्णाप्पा खोत, उदगाव बँकेचे संचालक दिलीप पाटील, रघुनाथ पुजारी, हयातचंद्र जमादार, साताप्पा कोलते, बाळासाहेब सुतार, समितीनाथ शेट्टी, रमेश पाटील, अश्विनी कांबळे, सागर पाटील, पौर्णिमा गोंधळी, शशिकला वाईकर, विजय गायकवाड, बाळाबाई कांबळे, बाळाबाई पुजारी, अनिता उगारे, अॅड. अनिरुद्ध कांबळे, आक्काताई कोळी, सतीश कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.